Headlines

पुण्यात बॅडमिंटन स्मारक आणि स्टेडियम उभारणार:महापौर मंजुषा नागपुरेंची घोषणा; पीडीएमबीएकडून खेळाडूंवर कौतुकाची थाप

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम आणि ‘दू पूना गेम मेमोरियल’ स्मारक उभारण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही घोषणा केली. बॅडमिंटन खेळाचा जन्म पुण्यात झाला हे जगाला दाखवण्यासाठी हे स्मारक उभारले जाईल, असे महापौर म्हणाल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन पुण्यात करता यावे, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले….

Read More

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी असेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका करताना हाके यांनी हे आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचे अज्ञान असल्याचे म्हटले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत, असे स्पष्ट केले. हाके म्हणाले की, मनोज…

Read More

भारत-अमेरिकेच्या कृषी कराराला‎ किसान युनियनकडून तीव्र विरोध:केंद्राने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी, जालन्यात राकेश टिकैत यांची मागणी‎

भारत-अमेरिका प्रस्तावित कृषी‎‎ आणि व्यापार ‎‎‎करारावरून ‎‎शेतकरी संघटनांनी ‎‎‎पुन्हा संघर्षाची ‎‎‎भूमिका घेतली‎‎ आहे.‎‎शेतकऱ्यांच्या ‎‎‎हिताशी ‎कोणतीही तडजोड मान्य नसल्याची ‎‎भूमिका भारतीय किसान युनियनचे ‎‎राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी ‎मांडली. . कृषी क्षेत्राशी संबंधित कोणताही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आंतरराष्ट्रीय करार करताना‎ सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताचे‎ संरक्षण झाले पाहिजे. अन्यथा त्याचे‎ परिणाम थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर‎ होतील, असे टिकैत म्हणाले.‎ महाराष्ट्रात संघटनात्मक ‎बांधणीला…

Read More

सुरक्षेच्या साहित्याअभावी कामगाराचा झाला मृत्यू:दोघांविरुद्ध पैठण पोलिसांत गुन्हा दाखल‎

जायकवाडी धरण परिसरातील इसारवाडी शिवारात डीएमआयसी-बिडकीन पाइपलाइनच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षा साहित्य न पुरवल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी पैठण एमआयडीसी ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नकुल बाबासाहेब शेळके (३३, रा. बोरगाव) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार विठ्ठल भानुदास अवधुत आणि दत्ता विठ्ठल अवधुत (दोघे रा. बोरगाव, ता. पैठण) यांच्यावर निष्काळजीपणाचा…

Read More

श्रीरामाविषयी अकबरुद्दीन ओवेसींचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित; समन्स रद्दला कोर्टाचा नकार:8 डिसेंबर 2011 रोजी नांदेडच्या सभेत केली होती रामासह कौसल्येची टिंगलटवाळी

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी ८ डिसेंबर २०११ रोजी नांदेड येथील सभेत प्रभू श्रीराम, माता कौसल्या यांची टिंगलटवाळी करणारी विधाने केली होती. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि २९८ अन्वये दा . न्या. आर. एम. जोशी यांनी ओवेसींची याचिका फेटाळून लावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी निकालाचा संदर्भ…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, ‘तुमच्यामुळे अडचण’

शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. तेव्हा भोंदू खरात या…

Read More

अवैध सावकारीच्या संशयावरून सहाय्यक निबंधकाच्या पथकाचा छापा:24 कागदपत्रे तपासणीसाठी घेतली ताब्यात

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथे अवैध सावकारीच्या संशयावरून सहाय्यक निबंधकांच्या पथकाने गुरुवारी ता. 6 एका घरावर छापा टाकून 24 कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये काही रजिष्ट्री, इसार पावत्यांचा समावेश आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाळा येथील धम्मपाल कांबळे हे अवैध सावकारी…

Read More

शरीराचे 12 तुकडे करून ट्रॉली बॅगमध्ये भरले:हात-पाय आणि बरगड्यांना तेजाबाने जाळले, CCTV मध्ये संशयित दिसले; आग्रा ट्रेनमध्ये सापडले होते

आग्रामध्ये तामिळनाडू एक्सप्रेसमध्ये सापडलेल्या ट्रॉली बॅगमध्ये मानवी शरीराचे 12 तुकडे होते. 72 तासांनंतर आलेल्या शवविच्छेदनानुसार, हत्या केल्यानंतर मृतदेहाला कटरने कापण्यात आले होते. त्याचे छोटे-छोटे तुकडे केले. यानंतर हे तुकडे बॅगमध्ये भरले. हात-पाय आणि बरगड्यांना तेजाबाने जाळले होते. यानंतर ते ट्रेनच्या जनरल बोगीमध्ये ठेवले. हे तुकडे महिलेचे आहेत की पुरुषाचे, यासाठी फॉरेन्सिक टीमने डीएनए नमुने घेतले…

Read More

ब्रोकरेज हाऊसेसनी डिकोड केली रिलायन्सची AGM:जिओ IPO मधून कमाईचा मार्ग खुला होईल, नवीन ऊर्जा व AI मुळे वाढ मिळेल; आज शेअर 2% वाढला

रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारादरम्यान 2% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर ₹1,345 च्या पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी झालेल्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभे (AGM) नंतर, अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी त्याच्या भविष्यातील रोडमॅप आणि जिओ इन्फोकॉमच्या IPO साठी सेबी (Sebi) कडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) संदर्भात त्यांचे विश्लेषण अहवाल…

Read More

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर:राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता; भाजप नेत्यांचीही भेट घेण्याचा अंदाज

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. त्या तिथे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेऊन आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय त्या भाजप पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतील असा अंदाज आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवला. त्यानंतर दोन दिवसांतच त्या दिल्ली दौऱ्यावर गेल्या…

Read More