Headlines

बहुमत असूनही 'प्रशासकीय' हस्तक्षेपाने सत्ता हिसकावली:पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर निर्माण झालेला सत्तासंघर्ष आणखी तीव्र झाला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बहुमत आमच्याकडे असतानाही प्रशासनाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कोयना दौलत डोंगरी महोत्सवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ही केवळ राजकीय लढत…

Read Full News

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read Full News

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी रुजू:जनहितार्थ प्रकल्पांना गती देण्यावर भर देणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी (१० मे) पदभार स्वीकारला. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर के. मंजुलक्ष्मी यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता,…

Read Full News

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या…

Read Full News

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग:छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी अनेक भागांत दुरुस्ती

येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील आणि वीजवाहिन्यांवरील यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी शुक्रवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी, वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना…

Read Full News

आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्ससह सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेतर्फे आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत…

Read Full News

गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी:चिनूक हेलिकॉप्टरमधून 3 किमी उंचीवरून सोडण्यात आले; पॅराशूटसह समुद्रात सुरक्षित लँडिंग

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या तयारीमध्ये मोठे यश मिळाले आहे. इस्रोने शुक्रवारी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी (IADT-1) यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी गगनयान मोहिमेसाठी तयार केलेल्या पॅराशूट प्रणालीच्या वास्तविक परिस्थितीची तपासणी करण्यासाठी करण्यात आली. याचा उद्देश गगनयान मोहिमेपूर्वी पॅराशूट उघडण्याच्या प्रक्रियेची तपासणी करणे हा होता. ही प्रक्रिया मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षित वापसी सुनिश्चित करेल….

Read Full News

पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील…

Read Full News

वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात होणार साजरी:बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांचा उत्सव

छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेरूळमध्ये भीम सैनिक मित्र मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करत जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वेरूळमध्ये मोठा बॅनर उभारण्यात आला. बॅनर ओपनिंग सोहळा डीजेच्या गजरात…

Read Full News

भारतीय स्टेट बँकेकडून निधी पुरवठ्याचा अभाव:हळद खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

हिंगोलीच्या भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांना निधीचा पुरवठा होत नसल्याने बाजार समिती अंतर्गत हळद व इतर शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून बँकेला आवश्‍यक सूुचना देण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी ता. १० केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, प्रशांत सोनी, पवन…

Read Full News