Headlines

नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाचा…

Read More

अकोले तालुक्याला पावसाचा तडाखा:धरणे ओसंडली, 52 घरांचे मोठे नुकसान, सर्व धरणे तुडुंब भरून सांडव्यावरून ओसंडून वाहताहेत, पांजरे शिवारात भूस्खलन‎

अकोले तालुक्यात गेल्या सुमारे आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. यामुळे भातखाचरांमधील लागवडी अंतिम टप्प्यात आल्या असून खरीप पिकांना जोरदार बळ मिळाले आहे. मात्र, मुसळधारेमुळे तालुक्यातील ५२ घरांचे नुकसान झाले. पांजरे शिवारात भूस्खलनाची घटना घडली आहे. जुलैच्या अखेरच्या टप्प्यात तालुक्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे: भंडारदरा धरण: धरण ९१.५७ टक्के…

Read More

विठूरायाच्या जयघोषाने दुमदुमला शाळेचा परिसर:बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत, विद्यार्थ्यांची उपस्थिती‎

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून सोडला. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांची दिमाखदार उंचावलेली पताका आणि “जय हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या अखंड…

Read More

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवणे महत्वाचे:अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांचे प्रतिपादन‎

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, कायद्याचे ज्ञान आणि व्यसनमुक्त जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर राहून वाचन, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक छंदांचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

Read More

Sensex Nifty Market Update; FMCG and IT Shares Rally Amid Strong Buying

मुंबई17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २७ जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ७६,६०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही १५० अंकांची वाढ झाली असून, तो २३,९५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एफएमसीजी, आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. कच्च्या तेलाची किंमत ९३ डॉलरवर आज ब्रेंट…

Read More

टँकरमुक्तीसाठी करंदीत प्रथमच बोअर ब्लास्टिंग:पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढणार, दहा बोअरमध्ये एकाच दिवशी स्फोट‎

नेहमीच टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर तालुक्यातील करंदी गावांत टँकरमुक्तीसाठी ग्रामपंचायतीने बोअर ब्लास्ट तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तलावाजवळ असूनही, जलस्त्रोत असलेल्या विहिरीची पाणी पातळी कमी असल्याचे दिसून आले. तलावाच्या पाणीपातळीप्रमाणे विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी, रविवारी १० बोअरमध्ये स्फोट घडवण्यात आले. करंदी हे टंचाईग्रस्त गाव असून, या ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने…

Read More

MPSC Drug Inspector Exam Controversy; Candidates Demand Probe

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोशल मीडियावर फिरल्याचा दावा करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसे . व्हॉट्सॲपवर प्रश्न फिरल्याचा दावा तक्रारीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाली होती….

Read More

विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट करून अभिनेत्री वादात:पर्ल मानेचे 2 दिवसांत 3 लाख इंस्टा फॉलोअर्स घटले; लिहिले होते- कोणताही मुद्दा जीवापेक्षा मोठा नाही

बिग बॉस मल्याळम 1 ची स्पर्धक तथा अभिनेत्री पर्ल माने विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट लिहून वादात सापडली आहे. सोशल मीडियावर विरोध वाढल्यानंतर, पर्ल मानेचे दोन दिवसांत 3 लाखांहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाले आहेत. कमेंट सेक्शन बंद केल्यानंतर हा वाद आणखी वाढला. ‘जीवनापेक्षा मोठा कोणताही मुद्दा नाही’ पर्ल मानेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांब पोस्ट शेअर…

Read More

मीटरची सरासरी किंमत 20 हजार रुपये:10 ते 15 लाख शेतकऱ्यांना मीटरने पाणी; 2 हजार 250 काेटींचा बाेजा, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची शिफारस

धरण, नदी यासह अन्य जलाशयातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 10 टक्क्यापर्यंत वाढ करण्यापाठोपाठ आता या पाण्याचे मोजमाप मीटरद्वारे करण्याची शिफारस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने केली आहे. आता त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जलसंपदा विभागावर आली आहे. मीटर बसवल्याने आर्थिक बोजा पडेल, असे कारण सांगून त्याला विरोध होऊ लागला आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राज्याला 10 ते…

Read More

इमामपूर, वांबोरी घाटात पावसाळ्यात दरडींचे अडथळे:दगड व सिमेंटचे अस्तरीकरण रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता, उपाययोजना शून्य‎

अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट आणि अहिल्यानगर-वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण घाट सध्या धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात डोंगरावरील दगड व सिमेंटचे अस्तरीकरण उखडून थेट रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सुद . यामुळे महामार्गाच्या एका पट्ट्यात मोठे दगड येऊन पडतात. सुदैवाने या दरडींखाली सापडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद झालेली…

Read More