शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांचे आवाहन
केंद्र व राज्य शासनाची मनरेगा योजनेचे नव्याने सुधारणा करून जीरामजी ही योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अनिता बनकर यांनी केले आहे. बनकर म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. सिंचन विहीर,गायगोठे, शेततळे,विविध फळ व वृक्षलागवड, पाणंद रस्ते सह विविध विकास कामांचा यात…