जायकवाडी धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ:53 टक्के साठा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना सिंचनाची आशा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जायकवाडी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी रात्री धरणात ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक…