Headlines

अन्नत्याग आंदोलन मागे:विद्यार्थ्यांनी सकाळी फुंकले रणशिंग; संध्याकाळी सांगता, नीटसह भरतीतील गैरप्रकारांवर तरूणाई आक्रमक‎

एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी,शिक्षक भरत, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी रणशिंग फुंकले. मात्र संध्याकाळी मागण्या मान्य झाल्याने अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारविरोधात निर्णायक आंदोलनाचा बिगुल वाजवत तरुणाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटली होती. रोज एका विद्यार्थ्यांने उपोषण करीत अन्य युवक या अन्नत्याग सहत्याग्रहात सहभागी…

Read More

पाक पोलिस अधिकारी हरियाणवी गाण्यांची चाहती:न्योलीवालाच्या रशियन बंधाना, राजू पंजाबीच्या 'चौधर जाट की' गाण्यावर बनवल्या रील्स; लाहोरमध्ये होत्या SSP

पाकिस्तानच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. अनूश मसूद चौधरी हरियाणवी गाण्यांच्या मोठ्या चाहत्या आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ढांडा न्योलीवालाच्या ‘रशियन बंधाना’, राजू पंजाबीच्या ‘चौधर पूरी जाट की’, खासा आला चाहरच्या ‘जय वीरू’ आणि सुमित गोस्वामीच्या ‘टोरा’ यांसारख्या अनेक गाण्यांवर रील्स बनवल्या आहेत. पेशावरच्या रहिवासी असलेल्या डॉ. अनूश सध्या पाकिस्तानच्या पंजाब एलिट पोलीसमध्ये उपसंचालक (प्रशासन)…

Read More

निंदणासाठी मजुर मिळेना; पाच तासांसाठी 250 रु. मजुरी:परिसरामध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी‎

महान व परिसरात सुमारे १२ दिवसांच्या मोठ्या उघडीपीनंतर गत १८ जुलैपासून पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि ज्वारी यांसारख्या खरिपाच्या पिकांना मोठी नवसंजीवनी मिळाली असून संपूर्ण परिसर हिरव्यागार पिकांनी बहरला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे आणि कडक उन्हामुळे पिके कोमेजून दयनीय अवस्थेत पोहोचली होती. मात्र, १८…

Read More

श्रीक्षेत्र लोणी टाकळी येथे जन्मोत्सवाचा समारोप:धार्मिक पालखी सोहळा, भाविकांना केले महाप्रसादाचे वितरण‎

लोणी टाकळी येथील ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज संस्थान (जन्मस्थान), येथे जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रमांसह या जन्मोत्सवाचा समारोप आज, शनिवारी आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने करण्यात आला. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी नित्य स्थापना, दुपारी गुलाब गौरव पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात परिसरासह…

Read More

12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांना फटका:19 राज्यांत पेपर माफिया, शिक्षक-पोलिस भरती टार्गेटवर; नीटमुळे संतापाचा कडेलोट

देशात पेपरफुटी आता कोणत्याही एका परीक्षा किंवा राज्याची समस्या राहिलेली नाही. हे संपूर्ण देशात पसरलेल्या एका मोठ्या संघटित नेटवर्कचे स्वरूप बनले आहे. 2014 पासून जुलै 2026 पर्यंत, मीडिया रिपोर्ट्स आणि सरकारी कारवाईच्या आधारावर, किमान 116 पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमुळे सुमारे 7.5 कोटी उमेदवार प्रभावित झाले आणि पेपर माफियाचे नेटवर्क 19 राज्यांपर्यंत पसरलेले…

Read More

शहरात धुवारणी, फवारणी नाही; साथीच्या रोगांचा धोका वाढला:नगरसेवक चंदू खेडकर पंप घेऊन फवारणी करुन आंदोलन करणार‎

शहरात निर्माण झालेली अस्वच्छता, साचलेले पाणी, डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढत आहे,असा आरोप नगरसेवक चंदू खेडकर यांनी केला आहे. महापालिका आयुक्त, स्वच्छता विभागाला दिलेल्या निवेदनातून त्यांनी शहरात फॉगिंग, कीटकनाशक फवारणी, जंतूनाशक पावडरचा वापर, स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्याची मागणी केली आहे.असे न केल्यास आपण स्वत:च पाठीवर पंप घेवून प्रभागापासून फवारणी सुरू करणार असल्याचा…

Read More

मेळघाटातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी उपाय केले जाणार:महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही‎

मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत राज्य शासन सकारात्मक पावले उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपाययोजना करण्यात येऊन मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. धारणी येथील तहसील…

Read More

भातकुली पंचायत समितीला मिळणार दुसरे दालन‎:गळतीयुक्त इमारतीचा सीइओंनाही आला अनुभव, नव्या इमारतीसाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यासाठीची अमरावतीत असलेली पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच आपला साज बदलणार आहे. या इमारतीचे बांधकाम फार जुने झाले असल्याने ती मोडकळीस आली आहे. सध्या गळकी इमारत म्हणून तिचा उल्लेख केला जात असून, पाणी गळण्याचा अनुभव सीईओ सत्यम गांधी यांनाही आला आहे. त्यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला अधिक गती आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

जंतरमंतरवरील आंदोलन संपले, स्वच्छता अभियान सुरू, 15 PHOTO:मंच – लाउडस्पीकर हटवले, आंदोलक परतले; बॅरिकेड्स रस्त्याच्या कडेला

नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात 20 जूनपासून जंतरमंतरवर सुरू असलेले धरणे प्रदर्शन शनिवारी संपले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आपले आंदोलन संपल्याची घोषणा केली. त्यानंतर जंतरमंतरवरून आंदोलक घरी परतले. येथे 36 दिवसांपासून लावलेला मंच काढण्यात आला. लाउडस्पीकर काढण्यात आले. त्यानंतर धरणेस्थळी राहिलेला कचरा एनडीएमसी आणि विद्यार्थ्यांनी साफ केला….

Read More

स्मार्ट कार्डमुळे एसटीची सेवा अधिक सुरक्षित, जलद, सुखकर होण्यास मदत:आमदार खोडकेंचे प्रतिपादन, आदिवासी कॉलनीतील एनसीएमसी शिबिराला प्रतिसाद‎

केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होत आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना रोख रकमेविना तिकीट व्यवहार करता येणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. येथील काँग्रेसनगर रोडवरील आदिवासी कॉलनी स्थित वीरांगणा दुर्गावती सभागृहात एसटी महामंडळाच्या…

Read More