नेवाशात पोलिसांची मध्यरात्री कारवाई; 48 किलो गांजा जप्त, वाकडी शिवारातील शेडवर छापा; एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा
नेवासे तालुक्यातील वाकडी परिसरात पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक व विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ४ लाख ७८ हजार ६० रुपयांचा तब्बल ४७.८२८ किलो गांजा जप्त केला आहे. २४ जुलैच्या रात्री ११.५० ते २५ जुलैच्या पहाटे १.५० च्या सुमारास…