Headlines

केळगाव प्रकल्पातून अवैध पाणी उपसा:परिसरात गावांना टंचाईची भीती

सिल्लोड | तालुक्यातील केळगाव प्रकल्पातून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पाणी उपसा होत असून, याकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे. केळगाव प्रकल्पातून अंभई, केळगाव, जांभई, रेलगाव आदी गावांची तहान भागवली जाते. मात्र या प्रकल्पातून रात्रीच्या वेळेस अवैधरित्या पाणी उपसा केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावत आहे. संबंधित…

Read More

दिलजीत म्हणाला- राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही:पोस्ट शेअर करून अफवांचे खंडन केले, म्हटले- संगीत व चित्रपटांवरच पूर्ण लक्ष केंद्रित राहील

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने राजकारणात येण्याच्या बातम्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू होती की दिलजीत पंजाबच्या राजकारणात प्रवेश करू शकतो. आता त्याने या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. दिलजीतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, “कदे वी नहीं.” म्हणजेच त्याचा राजकारणात येण्याचा कोणताही…

Read More

माउलींच्या पालखीत नाथांच्या‎भारुडाची भक्तिरसपूर्ण मैफल‎:युवक-युवतीही भारुडांकडे आकर्षित, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग

पैठण आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर संतांच्या विचारांचा आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी असलेल्या पैठणची ही अध्यात्मिक परंपरा यंदाही आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे. या पालखी सोहळ्यात नाथ महाराजांच्या भारुडांनी वारकऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले आहे. संत एकनाथ महाराजांचे भारुड हे केवळ…

Read More

मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर पुन्हा अपघात:बोगद्यातून चालत्या कारवर दोन ते तीन दगड पडले; काही दिवसांपूर्वीच झाला होता अपघात

मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. या पूर्वी काही दिवसांपूर्वीच या मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. आता देखील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असून, सुदैवाने जीवितहानी…

Read More

गौडगावात आज शनैश्वर जन्मोत्सव सोहळा:दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या जागृत मारुती मंदिरात तयारी, महाप्रसाद, यज्ञाचे आयोजन‎

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात शनिवार, १६ मे रोजी शनैश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर जुळून आलेल्या या विशेष ‘त्रिवेणी योगा’मुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वाता . या दुर्मिळ योगाचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री मारुतीराया आणि…

Read More

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश उन्हातही रूग्णांच्या नातेवाईकांवर गोळ्या-औषधींसाठी इकडे-तिकडे फिरण्याची डाबकी रोडवरील व्यक्तिला औषधीसाठी गांधी चौक, वाशीम स्टँडपर्यंत जावे लागले. ही मेडिकल स्टोअर्स अत्यावश्यक सेवेसाठी सुरू होती. ९ दुकाने…

Read More

गोपाल उपाध्याय: विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त रुजवा.:गुरुकुंज येथील जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन.

तिवसा: जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरावे, असे आवाहन गोपाल उपाध्याय यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त…

Read More

महाराष्ट्र, ओडिशा व बिहारमधून 4 जणांना अटक:पोलिस म्हणाले- खेळण्यांत बॉम्ब लावून हल्ल्याची तयारी करत होते; राम मंदिर, संसद निशाण्यावर होते

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने महाराष्ट्र, ओडिशा आणि बिहारमधून चार संशयित व्यक्तींना अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, त्यांच्याकडून IED आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींपैकी दोघे महाराष्ट्राचे, तर प्रत्येकी एक ओडिशा आणि बिहारचा आहे. त्यांची ओळख मोसाइब अहमद, मोहम्मद हम्माद, मोहम्मद सोहेल आणि शेख इमरान अशी झाली आहे. पोलिसांनुसार, दोन आरोपी रिमोट…

Read More

उद्धव ठाकरेंनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी:खासदार सुप्रिया सुळेंचे आग्रही ट्विट; हर्षवर्धन सपकाळांनीही घेतली 'मातोश्री'वर भेट

राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीतून काँग्रेसने आधीच अनुकूलता दर्शवली असताना, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी विनंती केल्याने शरद पवारांच्या…

Read More

हिंगोलीत चोरट्यांचा हैदोस!:तिरुपती नगर परिसरात घरांची 'रेकी' करून दोन दुचाकी पळवल्या; सीसीटीव्ही फुटेज समोर

हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दिवसाची वाहने पळविल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागामध्ये शुक्रवारी तारीख 26 पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पायाचा आवाज येऊ नये यासाठी पायातील चपला व बुट…

Read More