Headlines

खरवंडी कासार बंद:चोऱ्यांविरोधात नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन




पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी या मागण्यांसाठी शुक्रवारी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवून नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तीन दिवसांपूर्वी परिसरात दोन ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच मागील काही महिन्यांत झालेल्या अनेक चोरीच्या घटनांचा अद्याप उलगडा झालेला नाही. सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ कीर्तने म्हणाले, परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनी तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली. खरवंडी कासार येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणीसाठी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, पोलीस चौकीतील मनुष्यबळ वाढवून अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *