Headlines

केडगावात 700 विद्यार्थ्यांनी दिला संस्कार अन् पर्यावरणाचा प्रभावी संदेश

प्रतिनिधी|अहिल्यानगर केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तीमय वातावरणात ‘पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी’ हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी वारकरी बनत महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, संस्कारांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, प्रभू श्रीराम,…

Read More

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर FDA चा इशारा:भगर खरेदी करताना काळजी घ्या; 'पॅकबंद' भगरीचीच विक्री करण्याचे आदेश

बाजारपेठेतून उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर भगर खरेदी विक्री होत असून व्यापाऱ्यांनी निकृष्ठ दर्जाची भगर किंवा इतर अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्यास कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. विक्रेत्यांनीही पॅकबंद भगरीची विक्री करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत. आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी मोठ्या प्रमाणावर भगरीचा वापर केला जातो. भगर खरेदी करतांना आवश्‍यक काळजी न…

Read More

मुव्ही रिव्ह्यू : उत्तर दा पुत्तर:वास्तूच्या निमित्ताने चित्रपट जोरदार टोमणा मारतो, नशीब खरंच दिशांनी बदलते का?

वास्तुशास्त्र, नशीब आणि अंधश्रद्धा यांसारख्या विषयांवर अनेकदा चर्चा होते, पण चित्रपटांमध्ये ते हलक्याफुलक्या आणि मनोरंजक पद्धतीने फार कमी वेळा दाखवले जाते. ‘उत्तर दा पुत्तर’ याच प्रयत्नाने येते. चित्रपट हसवतो, उपहास करतो आणि शेवटी एक असा प्रश्न सोडून जातो, जो कदाचित थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही तुमच्यासोबत राहतो. मात्र, काही उणिवा त्याला आणखी चांगले बनण्यापासून रोखतात. या चित्रपटाची…

Read More

बीडीओंच्या कक्षात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांडला ठिय्या:पालकमंत्र्याच्या दालनात डेरा देऊन बेघर झोपडी आंदोलनाचा इशारा‎

घरकुल लाभार्थींची २०२२ पासून प्रलंबित असलेली प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात यावी. मंजूर घरकुल बांधकाम करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या पैशाचे त्वरित वितरण करण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी २३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते गटविकास अधिकारी पंचायत समिती मोर्शी यांच्या कार्यालयात धडकले. त्यांनी चक्क गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात शिरून…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढला:घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नाशिक-पालघरमध्ये पूरस्थिती; अनेक गावांचा संपर्क तुटला

राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने पुणे, नाशिक आणि कोकणातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड आणि ऑरेंज अलर्ट) दिला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, शेजारील गुजरात राज्यातही पावसाने ‘मेघतांडव’ सुरू केले असून, तिथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील…

Read More

वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी:अवघ्या दीड तासात शिक्षिकेचे घर फोडून साडेतीन लाखांचे दागिने लांबवले

वसमत येथील बँक कॉलनी भागात अवघ्या दिड तासात शिक्षिकेच घर फोडून चोरट्यांनी 3.50 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 23 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके स्थापन केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील बँक कॉलनी भागातील शिक्षिका गोदावरी भवानगर ह्या गुरुवारी…

Read More

'टी-सीरीजचा प्रतिस्पर्धी', तरीही खुशहालीला केले कास्ट:दिग्दर्शक आकाशादित्य लामा म्हणाले- मी फक्त प्रतिभावान अभिनेत्री पाहिली

चित्रपट ‘दुल्हनिया ले आएगी’ संदर्भात अभिनेत्री खुशहाली कुमार आणि दिग्दर्शक-निर्माता आकाशादित्य लामा यांनी दैनिक दिव्य मराठीशी विशेष संवाद साधला. मुलाखतीत लामा यांनी विनोदी शैलीत स्वतःला टी-सीरीजचा ‘प्रतिस्पर्धी’ असल्याचे सांगत खुशहालीच्या निवडीचे कारण सांगितले. दोघांनी लग्नाबाबत तरुणांच्या बदलत्या विचारांवर, नात्यांमधील विश्वासाचे महत्त्व आणि चित्रपटाच्या संदेशावर चर्चा केली. खुशहालीने पीयूष मिश्रा आणि महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा…

Read More

NEET प्रकरणी सरकार गंभीर:फास्ट ट्रॅक कोर्टपासून विद्यार्थ्यांशी संवादापर्यंत मुरलीधर मोहोळांनी मांडली भूमिका, काँग्रेसवर टीकास्त्र

नीट पेपरफुटी प्रकरण, त्यानंतर झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि काँग्रेसची भूमिका यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक होत विरोधकांचा समाचार घेतला आहे. सरकारने पेपरफुटी प्रकरणात तातडीने सीबीआयची एसआयटी नेमली असून आतापर्यंत १३ जणांना गजाआड केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर मोहोळ यांनी टीका केली…

Read More

दोन कंत्राटदार काळ्या यादीत; वेतन थकवणे, करारभंग भोवला:ई-बस सेवेसाठी नाशिक येथील सल्लागार नियुक्त‎

मनपा स्थायी समितीच्या सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण वेतन जमा न करणे, कर न भरणे आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एनटीएस ग्रुप, अकोला आणि महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेस, संभाजीनगर या दोन कंत्राटदारांना मुदतवाढ नाकारण्यात आली. तसेच पंतप्रधान ई-बस सेवा योजनेसाठी नाशिकच्या सल्लागार…

Read More

रोहित पवारांचा पोलिसांच्या भूमिकेवर संताप:म्हणाले- अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR ची हिंमत दाखवली नाही, अन् विद्यार्थ्यांवर कारवाई?

नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर राज्यभरात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत पोलिसांच्या कारवाईला ‘दिल्लीच्या पोलिसांपेक्षाही क्रूर’ म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा ही दडपशाही सरकारच्या अंगलट येईल, असा इशाराही…

Read More