"इस्तीफा दो…’च्या घोषणांमुळे दणाणले रस्ते:काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
दिल्ली येथील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याचे आज, गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही अमरावतीत पडसाद उमटले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धरणे, निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली. “धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो…’ विद्यार्थीयोंको न्याय दो…नरेंद्र मोदी हटाव-देश बचाव…अशा संतप्त आणि जोशपूर्ण घोषणांनी शहरातील जयस्तंभ चौक व संपूर्ण मार्केट परिसर दणाणून गेला होता. वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,…