केतनच्या हत्येसाठी लोहगड निश्चित करण्यापूर्वी अन्य ठिकाणांची पाहणी:केतनला जखमी करण्यासाठी ‘सुपारी’ देण्याच्या पर्यायावर चर्चा
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासात कटाच्या नियोजनासंदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनचा मृत्यू अपघात असल्याचे भासवण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यापूर्वी सिया आणि चेतन यांनी लोणावळा परिसरातील अनेक दुर्गम ठिकाणांची माहिती घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामध्ये लोणावळ्यातील टायगर पॉइंट, लोहगडलगतचा विसापूर किल्ला तसेच परिसरातील अन्य किल्ल्यांचा समावेश होता, अशी माहिती तपास पथकातील एका…