Headlines

मोदी म्हणाले- पेपर लीक केससाठी फास्ट ट्रॅक कोर्ट बनवू:राहुल म्हणाले- तुम्ही शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यास जबाबदार; CJP म्हणाली- पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरील आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी X वर पोस्ट करून लिहिले की, पेपरफुटीच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स स्थापन केले जातील. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही. यावर राहुल गांधींनी X वर पोस्ट करून म्हटले की, तुम्हीच तरुणांच्या…

Read More

Divija Fadnavis Reacts On NEET Exam Controversy; Advises Youth

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आता संसदेपर्यंत पोहोचली आहे. या लढ्याला सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळत असतानाच, महाराष् . शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार दिविजा फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मात्र, आंदोलकांनी पोलिसांवर किंवा पोलिसांनी…

Read More

गुरुग्राम-मेदांतामध्ये 600 जवानांच्या सुरक्षेत सोनम वांगचुक:म्हणाले-आश्वासन मिळाल्यास आजच उपोषण सोडू, नड्डा म्हणाले-तुमचे पत्र मिळाले, चर्चा करत आहोत

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज, म्हणजेच गुरुवारी, २६ वा दिवस आहे. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांना दाखल होऊन दोन दिवस झाले आहेत. बुधवारी त्यांना भेटायला आलेल्या आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ति मोर्चा आणि समाजवादी पार्टीच्या १५ विरोधी खासदारांना पोलिसांनी रोखले होते. पोलीस आणि खासदारांमध्ये वाद झाला. संतप्त खासदार गेटवरच धरणे धरून बसले. यावरून सुमारे एक तास…

Read More

संभाजीनगरात 10 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न:रिक्षा नालीत अडकल्याने अनर्थ टळला, नागरिकांनी पाठलाग केल्याने अपहरणकर्ता पसार

शहरातील शहागंज बाजारात बुधवारी (22 जुलै) रात्री दहा वाजेच्या सुमारास एका 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रकार समोर आला आहे. एका मुलीचे तोंड दाबून तिला रिक्षात बसवल्याचे लक्षात आल्याने तिघांनी त्याचा पाठलाग केला. अपहरणकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कोषागार कार्यालयाकडे ऑटोरिक्षा वळवली. मात्र, तेथे नालीत रिक्षा रुतल्याने तो रिक्षा व मुलीला सोडून पसार झाला. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार…

Read More

नाशिकमध्ये पावसाचा कहर:गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी; अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलीय. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले असून रामकुंड परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. गोदाघाटावरील अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. याच दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने रात्रभर…

Read More

धाराशिव-बीड-संभाजीनगर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी:डीपीआर प्रक्रिया सुरू, लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या सुमारे २४० किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. या बहुप्रतीक्षित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. सर्वेक्षणानंतर राज्य शासन, नीती आयोग व अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पुढील टप्प्यांचा निर्णय घेतला जाईल….

Read More

विद्यार्थ्यांना अमानुषपणे झालेली मारहाण ही हुकूमशाही- बाळासाहेब थोरात‎:दिल्लीतील लाठी हल्ल्याचे संगमनेरात तीव्र पडसाद; शहरामध्ये मशाल मोर्चा

दिल्ली येथे विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हजारो संगमनेरकर आज रस्त्यावर उतरले. या घटनेचा तीव्र निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षणमंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करताना हजारो युवक विद्यार्थी महिला व नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संगमनेर दणाणून सोडले. याचवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकूमशाही असल्याची…

Read More

टाळ-मृदुंगाच्या तालावर राहुरीकर झाले तल्लीन:दिंडी सोहळ्याने वेधले उपस्थितांचे लक्ष, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश‎

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशांनी सजलेल्या फलकांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रशालेच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातून सुरू झालेली ही…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण, 76,400 वर:निफ्टीही 100 अंकांनी घसरला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 23 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 76,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची घसरण आहे, तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. कच्च्या तेलाची किंमत 96 डॉलरवर पोहोचली ब्रेंट क्रूडमध्ये आज सुमारे 2% ची वाढ आहे. ते…

Read More

आषाढीच्या मुहूर्तावर शेवगाव आगाराची नवी भरारी; ताफ्यात 5 आधुनिक बस

आषाढी एकादशीपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगाराला नव्या ५ बस मिळाल्या आहेत. या बस उद्यापासून नियमित प्रवासी सेवेत दाखल होणार असून ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे. शेवगाव व पाथर्डी आगारासाठी प्रत्येकी १० नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप…

Read More