Headlines

अपघातग्रस्त विद्यार्थिनीला सुनेत्रा पवारांची तत्पर मदत:ताफा थांबवून रुग्णालयात दाखल केले, संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस केली आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. मिळालेल्या माहितीनुसार, जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोची धडक बसली. धडकेनंतर ती वाहनासह रस्त्यावर पडून…

Read More

मुंबईची हिंमत!:आंदोलकांनी भरलेली पोलीस व्हॅन अडवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, संजय राऊतांनी केली पोस्ट

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दादरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनासमोर एका तरुणीने उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर शेअर करत मुंबईची हिंमत अशी प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल…

Read More

विजय वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात:म्हणाले- चोरांच्या उलट्या बोंबा! नीट पेपर तुम्ही फोडला अन् आंदोलनही तुम्हीच करता?

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान काल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नेत्यांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी लोकशाही नव्हे तर हुकूमशाही असल्याचे म्हटले. तसेच, काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपने केलेल्या आंदोलनाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला असून,…

Read More

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक निर्बंध:6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी, परवानगीशिवाय आंदोलन केल्यास गुन्हा

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात 24 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय आंदोलन किंवा मोर्चा काढल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी…

Read More

भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे उघड:100 रुपयांचे चिंचोके विकले लाखोंना, भक्तांच्या पॅन-आधारचा गैरवापर करून उघडली बोगस खाती!

स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेत भाविकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुमारे 42 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, तपासादरम्यान त्याचे अनेक धक्कादायक आणि हादरवणारे कारनामे समोर आले आहेत. अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने भाविकांची केवळ आर्थिक लूटच केली…

Read More

तुकाराम मुंढेंचा मुंबई महापालिकेलाही दणका!:दररोज 7 ते 8 हजार जण जेवण करणारे BMC मुख्यालयातील कॅन्टीन सील; FDAची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाया राज्यभर सुरूच असून, आता त्यांच्या कारवाईचा फटका थेट बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालयालाही बसला आहे. FDAच्या पथकाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकत तपासणी केली आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने कॅन्टीन सील करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचारी आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेली भोजन व्यवस्था…

Read More

आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत:विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अभिनेता समीर चौघुले संतापले, ट्रोलर्सनाही सुनावलं

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर भावनिक आणि संतप्त पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत त्यांनी…

Read More

आंदेकर टोळीला मोक्का अंतर्गत 5 दिवसांची पोलिस कोठडी:वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील तीन आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि हर्षल वाडेकर अशी या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात अक्षय ऊर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पत्नीने सहकारनगर…

Read More

फास्ट ट्रॅक कोर्टचे स्वागत, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कधी?:पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर रोहित पवारांचा सवाल

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना तातडीने शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आभार मानत स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

संसदेचे पावसाळी अधिवेशन:संसदेबाहेर NDA आणि इंडिया ब्लॉकच्या खासदारांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी; नीट पेपरफुटीवर गदारोळाची शक्यता

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी संसद भवन परिसरात एनडीए आणि विरोधक आमनेसामने आले. भाजपसह एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी मकर दरवाजासमोर राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. एनडीए पंतप्रधान निवासस्थानाबाहेर २१ जुलै रोजी राहुल गांधींच्या धरणे आंदोलनाचा निषेध करत आहे. दुसरीकडे विरोधी खासदारांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. संसदेत आज सलग चौथ्या दिवशी नीट पेपरफुटी…

Read More