सौंदाळे येथे पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी केला रस्तारोको:रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी
सौंदाळा (ता.नेवासे) येथील गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेतकऱ्यांनी भर पावसात नेवासे-शेवगाव राज्यमार्गावर सौंदाळा येथे रस्तारोको आंदोलन केले. सौंदाळा गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून हा रस्ता कायमस्वरूपी खुला करुन या रस्त्याचे अधिकृत सीमांकन करून…