Headlines

दर्यापूर न्यायालयासमोरील झाडाखाली व्यक्तीचा मृतदेह आढळला:उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय, तपास सुरू

दर्यापूर येथील न्यायालयासमोर सोमवारी सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख दादाराव नकुल शिवरकर (वय ३५, रा. समता नगर, दर्यापूर) अशी पटली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाराव शनिवारपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात…

Read More

शरद पवार गटाचा भाजप, RSS वर तिखट पलटवार:आचार्य तुषार भोसले हा भाजप, संघाने वारकरी संप्रदायात सोडलेला ढोंगी वारकरी

शरद पवारांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांच्या घुसखोरी झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरकसपणे पलटवार करत भाजप व संघाने तुषार भोसले नामक ढोंगी वारकरी, वारकरी संप्रदायात सोडला असल्याचा आरोप केला आहे. शरद पवारांनी शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या…

Read More

सिद्धेश्वर एक्स्प्रेसवरील दरोड्याचा कट उघड:धाराशिवच्या 9 महिला अटकेत, कुर्डुवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या धाराशिवच्या नऊ महिलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. जेऊर ते कुर्डुवाडी दरम्यान बोगीत संशयितपणे वावरणाऱ्या महिलांच्या टोळीचा कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. चौकशीअंती सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली. महिलांच्या हालचाली संशयास्पद बुधवार, २२ एप्रिल रोजी पहाटे ५ ते ५.३० च्या सुमारास मुंबईहून सोलापूरकडे येत…

Read More

शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल- लक्ष्मीकांत देशमुख:गांधी दर्शन शिबिरात माजी सनदी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन

छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे संविधानातील समतेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल ठरले, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या गांधी दर्शन शिबिरात ते बोलत होते. गांधी भवन, कोथरूड येथे रविवारी झालेल्या या शिबिरात देशमुख ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’…

Read More

पुण्यात भरधाव टँकरमुळे वाढले अपघात:बेशिस्त चालकांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई, नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पुण्यात भरधाव टँकरमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेशिस्त टँकरचालकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी टँकरचालक आणि मालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोंढवा पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांनी पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरचालक आणि मालकांसाठी एका बैठकीचे आयोजन…

Read More

विधान परिषदेच्या रिंगणातून सत्तार पुत्राच्या माघारीमागे जिल्हा बँकेतील सत्तेचे गणित:सत्तार यांच्या माघारीच्या घोषणेमुळे भाजपचा जीव पडला भांड्यात

भारतीय जनता पक्षाला महायुतीमध्ये प्रथमच छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ सुटला. मात्र, शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्राने केलेल्या बंडखोरीमुळे भाजपच्या तोंडचे पाणी पळाले होते. भाजपने फुलंब्रीचे माजी नग . जिल्ह्यात ८०० कोटींची उलाढाल असलेल्या बँकेचा संचालक होणे आमदारापेक्षा कमी नाही. जिल्ह्याच्या राजकारणात स्थान पक्के करण्यासाठी जिल्हा बँक, दूध संघ ही सत्तास्थाने…

Read More

Hydrogen & Vande Bharat Sleeper Trains Launch; Ticket Cancellation Easy

Marathi News Business Indian Railways: Hydrogen & Vande Bharat Sleeper Trains Launch; Ticket Cancellation Easy नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवास आरामदायक आणि हाय-टेक बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीट रद्द करणे आणि परताव्याच्या नियमांमध्ये बदल करण्यापासून ते देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन रुळांवर आणण्याची तयारी पूर्ण…

Read More

कल्याण बॅनर्जींचा आरोप- भाजप समर्थकांनी हल्ला केला:चोर-चोरच्या घोषणा दिल्या; म्हटले- एक निरंकुश मुख्यमंत्री आपल्या विरोधकांना संपवू इच्छितो

टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रविवारी आरोप केला की, पोलिस स्टेशनबाहेर भाजप समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जखमी केले. बॅनर्जी हुगळीमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात निवेदन देण्यासाठी चंडीतला पोलिस स्टेशनला गेले होते, जिथे गर्दीने त्यांना घेरले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात कल्याण बॅनर्जी सुरुवातीला पोलिस स्टेशनबाहेर घोषणा देताना दिसले. नंतर…

Read More

सत्कार झाला, पण चर्चा “त्यागा’च्या मिश्किल कोपरखळीची:4 आमदारांच्या सत्कार सोहळ्यात आ. कोल्हे म्हणाले, सुजयदादांच्या त्यागामुळे माझा नंबर लागला‎

. विधान परिषदेवर गेलेल्या जिल्ह्यातील ४ नवनिर्वाचित आमदारांचा शुक्रवारी झालेला सत्कार सोहळा चांगलाच रंगला. काहीसे शिस्त व गंभीर वाटणाऱ्या राजकीय मंचावर आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे आभार मानले. पण ते मानताना त्यांनी “माजी खासदार सुजय विखे यांनी त्याग केला म्हणून आपला नंबर लागला’ हे वक्तव्य उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, सुजय…

Read More

शेतकऱ्यांना सिंचन अनुदानासाठी स्वहिस्सा देण्याची गरज नाही:'सेंट्रल बँक डिजिटल चलन' प्रणालीद्वारे थेट वितरण, लाभ घेणे सोपे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (टप्पा-२) राज्यातील ७ हजार २०१ गावांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना आता ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान थेट ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन’ (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदीसाठी आपला स्वहिस्सा आधीच जमा करण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा…

Read More