5 महिन्यांपासून नवे गॅस कनेक्शन बंद:52 हजार ग्राहक ‘वेटिंग’वर, दुसऱ्या सिलिंडरसाठी 35 हजार अर्ज दाखल
गॅसटंचाईचे कारण पुढे करत शासनाने मार्च 2026 पासून नवीन घरगुती वापराच्या गॅसचे (एलपीजी) कनेक्शन देण्यावर अघोषित बंदी घातली. परिस्थिती पूर्वपदावर येऊनही ही बंदी कायम असल्याने, सर्वसामान्यांसह नोकरी-उद्योगासाठी शहरात आलेल्या स्थलांतरित नागरिक आणि कामगारांचे हाल होत आहेत. तब्बल 52 हजार नागरिक नवीन कनेक्शन घेण्यासाठी वेटिंगवर असून दुसऱ्या सिलिंडरसाठीदेखील सुमारे 35 हजार कनेक्शनधारकांनी मागणी केल्याची माहिती उच्चपदस्थ…