Headlines

नात्याला काळीमा:फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल

बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना सिल्लोड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. एका नराधम चुलत भावाने आपल्याच अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी मुलीला शेतात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर प्रथम…

Read More

या मुलांना इतकं मारलं की 3 दिवस जेवले नाहीत:आता सरकार पलटी करण्याची वेळ, दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देत महादेव जानकरांचा घणाघात

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात तीव्रतेने उमटत आहेत. विद्यार्थ्यांवरील या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर हे आज थेट दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचले आहेत. तिथे पोहोचून त्यांनी पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची…

Read More

NEET Paper Leak Protest; Congress Agitation in Nagpur and Pune

‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे. दिल्लीतील राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मंगळवारी महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे येथे काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने . दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. नागपूर आणि पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार,…

Read More

शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट:जंतरमंतरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालच जंतरमंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो नुकतेच समोर आले असून, राजकीय वर्तुळात या बैठकीची चर्चा सुरू झाली आहे. जंतरमंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट दिल्लीतील…

Read More

बदलापुरात साडी घेऊन न दिल्याले पत्नीने अपंग पतीला संपवले:राग अनावर झाल्याने डोक्यात कुकर घालत आवळला गळा, मुलाच्या एका साक्षीने पत्नीचे कृत्य उघड

साडी खरेदी करून दिली नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या तीव्र वादातून पत्नीने आपल्याच अपंग पतीची कुकर डोक्यात मारून आणि गळा आवळून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बदलापूर पूर्व येथील शिरगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या असून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरगाव परिसरात हरेराम…

Read More

MNS Protest At Azad Maidan Over Chembur School Bus Accident BMC Report

मुंबईतील चेंबूर येथे स्कूल बसवर झाड पडून झालेल्या 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) चौकशी अहवालात कुणालाही दोषी न धरल्याने संतापाची लाट उसळली आहे. या ‘बेजबाबदार व्यवस्थेचा’ निषेध करण्यासाठी आणि संबंधि . नेमके प्रकरण काय होते? काही दिवसांपूर्वी चेंबूर भागात एका स्कूल बसवर अचानक एक मोठे झाड कोसळून एका 11 वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा…

Read More

पुण्यात अपघात:कात्रज बोगद्याजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या कात्रज बोगदा परिसरात घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवाजी भारत वाघमारे (वय ४२, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाघमारे यांचा पुतण्या किरण (वय ३०) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद…

Read More

विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची फसवणूक:साडेचार लाखांची फसवणूक, चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून एका संगणक अभियंता तरुणीची ४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी वडगाव शेरीतील सोमनाथनगर येथे राहते. ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत आहे. तिने एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी…

Read More

पुणे जिल्ह्यात मुसळधार:खडकवासला धरण प्रणालीत 66% पाणीसाठा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी सकाळी खडकवासला धरण प्रणालीमध्ये एकूण 19.27 टीएमसी म्हणजेच 66 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रणालीची एकूण उपयुक्त साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे. खडकवासला धरण प्रणालीतील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला धरणात 1.43…

Read More

नवी मुंबईत गुंडांचा हैदोस:घरासमोर बसू नको म्हणाणाऱ्या तरुणासह आईवर तलवार अन् चॉपरने जीवघेणा हल्ला, एकाला अटक

नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर बसण्याला विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. इतकेच नव्हे, तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी सोडले नाही; तिच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिला…

Read More