पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील रहिवासी आक्रमक:आरएमसी प्लांट बंद करा; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द, धायरी आणि प्रेयेजा सिटी परिसरातील बेकायदेशीर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांट त्वरित बंद करून महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर हलवण्याची मागणी ‘सिंहगड रोड आरएमसी प्लांट विरोधी कृती समिती’ने केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. समितीच्या म्हणण्यानुसार, हे प्लांट प्रथम महापालिकेच्या हद्दीबाहेर हलवावेत आणि त्यानंतर त्यांच्यासाठी नियमावली तयार…