स्टील दुकानाच्या आडून चालणाऱ्या तांबे चोरीचा जामखेड पोलिसांकडून पर्दाफाश:शेती पंपाच्या 1,635 किलो तांब्याच्या तारांसह दुकानमालक पोलिसांच्या जाळ्यात
शहरातील तपनेश्वर रोडवरील एका नामांकित स्टील आणि भांड्याच्या दुकानावर जामखेड पोलिसांनी गुरुवारी (१६ जुलै) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना दुकानातून शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या सोललेल्या तारांचे लहान-मोठे तुकडे असलेल्या तब्बल ३९ गोण्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या १,६३५ किलो तांब्याची बाजारपेठेतील किंमत ९ लाख ७९ हजार २०० रुपये आहे….