जय बाबाजी परिवारातर्फे अयोध्येत 1100 भाविकांचे 2 तास श्रमदान:100 पेक्षा जास्त गाेण्या कचरा संकलन करत स्वच्छता मोहीम
श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित वार्षिक ‘ॐ जगदगुरू जनशांती धर्म सोहळ्यात अध्यात्माबरोबरच समाजात श्रमसंस्कार रुजविण्याच्या उद्देशाने महाश्रमदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. भक्त परिवारातील ११०० भाविकांनी २ तास श्रमदान करत १०० गोण्या कचरा संकलीत करण्यात आला. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र अयोध्या येथे आयोजित धर्म सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप यांसह विविध भरगच्च…