Headlines

लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकाचे टिन शेड कोसळले:टीटीईसह 3 जण गंभीर जखमी; हावडा-डेहराडून एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर पोहोचली, नंतर थांबवली

लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-5 वरील टीन शेड कोसळले. यात एक टीटीई आणि 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आरपीएफ बचावकार्य करत आहे. तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच प्लॅटफॉर्मवर हावडा-डेहराडून एक्सप्रेस (13037) प्लॅटफॉर्मवर पोहोचली होती, तिला नंतर थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी क्रेन मागवली, ज्यामुळे टीन शेडचा खाली पडलेला भाग बाहेर काढला…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट, 5 जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर…

Read More

बिल्डरांच्या खोट्या हमीपत्रांमुळे पुणेकरांची फसवणूक:टँकरचा खर्च बिल्डरांकडून वसूल करण्याची नगरसेवकांची मागणी

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिल्डरांकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. नवीन गृहप्रकल्पांमध्ये पाणीपुरवठ्याची लेखी हमी देऊनही बिल्डर ती पाळत नाहीत, त्यामुळे सोसायट्यांना दरमहा लाखो रुपये खर्च करून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. हा खर्च संबंधित बिल्डरांकडूनच वसूल करण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. नगरसेवक सचिन दोडके यांनी यावर प्रकाश टाकत सांगितले की,…

Read More

बसने 100 च्या स्पीडने पिकअपला उडवले, 13 मृत्यू:कटिहारमध्ये रस्त्यावर विखुरले मृतदेह; बाईकस्वाराला चिरडून बस चालक पळून जात होता

बिहारमधील कटिहार येथे शनिवारी उशिरा संध्याकाळी बस आणि पिकअपच्या धडकेत 13 लोकांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील 5 लोक होते. मृतांमध्ये 10 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलगी आहे. यात 11 मृत पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी होते, तर दोघे कटिहारचे होते. अपघातात 32 हून अधिक जखमी झाले आहेत. यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा…

Read More

राम मंदिर देणगी चोरी- 8 आरोपींच्या घरी छापेमारी:एकाच वेळी छापा टाकला; टिन्नूच्या घराला कुलूप, पोलिसांकडून शेजाऱ्यांची चौकशी

राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या 8 आरोपींच्या घरी रविवारी सकाळी 7 वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या 6 पथकांनी एकाच वेळी आरोपींच्या घरावर धाड टाकली. कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. शेजाऱ्यांचीही चौकशी केली. छाप्यात रामशंकर यादव उर्फ टिन्नूच्या घराला कुलूप लावलेले आढळले. छाप्यात महसूल विभागाचे अधिकारी, विशेषतः तलाठी, यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. आरोपींच्या घरातून…

Read More

1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

. ‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल २८०० देशी झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या काळात ग्रामस्थांनी एकत्र येत…

Read More

हिंगोलीत राजकीय भुकंप:माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेलांचा शिंदेसेनेत प्रवेश, वसमत, औंढा तालुक्यात पक्षाला बळ मिळणार

काँग्रेस, राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेस अन राष्ट्रवादी असा राजकिय प्रवास करीत माजी समाज कल्याण सभापती मुनीर पटेल यांनी अखेर शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. गुरुवारी ता. 21 मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेसेनेला वसमत व औंढा नागनाथ तालुक्यात बळ मिळणार आहे. हिंगोली जिल्हा…

Read More

पाणीटंचाई निवारणार्थ 90 गावांतील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती:जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता; पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत‎

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहीर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ९० गावांतील विंधन विहिरी दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान…

Read More

एकनाथ खडसे-विनोद तावडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण:भाजप घरवापसीच्या चर्चांवर नाथाभाऊंचे स्पष्टीकरण

मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची झालेली भेट राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा चर्चांना वेग आला. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे विविध अर्थ लावले जात आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी या…

Read More

थरार:संभाजीनगरात पोलिस ठाण्यासमोरून पिस्तूल, कोयते‎ मिरवत गुंडांनी घातला रस्त्यात धिंगाणा‎, शिवजयंतीच्या जुन्या वादातून भरदिवसा गँगवाॅर; दोघांना अटक‎

शहरातील सातारा परिसरातील म्हाडा‎ कॉलनी भागात शुक्रवारी (१९ जून)‎ भरदुपारी गुंडांनी पिस्तूल आणि‎ कोयते घेऊन तरुणांवर प्राणघातक ‎हल्ला केला. विशेष म्हणजे, सातारा‎ पोलिस ठाण्यासमोरून राजरोसपणे‎ हा थरारक पाठलाग झाला. . याप्रकरणी ‎पोलिसांनी मुख्य आरोपी संघपाल‎ वाटोडे आणि हर्षवर्धन प्रमोद इंगोले‎ यांना अटक केली आहे. न्यायालयाने ‎त्यांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी ‎सुनावली आहे. एका अल्पवयीन‎ आरोपीची…

Read More