गृहकारभार पांडू हवालदार चालवतायत!:हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर हल्लाबोल, 26 जुलैच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आक्रोश, लोकशाहीचे संरक्षण आणि केंद्रीय…