पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी…