मालेगावमध्ये 84 पैकी 83 नगरसेवकांचे मतदान:हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने झाले नाही मतदान
मालेगाव विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी (दि.१८) महापालिकेच्या ८४ पैकी ८३ नगरसेवकांनी तहसील कार्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. एमआयएमचे नगरसेवक आमदार मुफ्ती पुत्र हाफिज अब्दुल्ला हज यात्रेवर असल्याने त्यांचे मतदान झाले नाही. दरम्यान, मालेगाव सेक्यूलर फ्रंटच्या इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसच्या ४३ नगरसेवकांनी लोकशाही वाचविण्यासाठी तानाशाहीविरोधात मतदान केल्याची भूमिका मांडत २२ जूनला लोकशाहीचा विजय होईल,…