विठ्ठल मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित:जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार
आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर शहरातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार मंदिर परिसर ‘वाहन प्रतिबंध क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए . आषाढी यात्रा कालावधीत श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार आणि महाद्वार चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. भाविक येथूनच…