भाजप नगरसेवक, जि.प. सदस्यांना बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी:जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न
स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवला आहे. जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना प्रचारासाठी लावले आहे. येत्या ४ जुलै रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतमोजणी होईल….