Headlines

पुण्यात भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू:एनडीए रस्ता, संगमवाडी परिसरात दोन अपघात

पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. एनडीए रस्ता आणि संगमवाडी परिसरात या घटना घडल्या. भरधाव मोटारींच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणांचा बळी गेला असून, दोन्ही प्रकरणांमध्ये मोटारचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एनडीए रस्त्यावर घडलेल्या पहिल्या घटनेत, राजू नारायण चव्हाण (वय 31, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रस्ता) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. कामावरून घरी परतत…

Read More

भाजपचे शिरसाठ यांचा पहिल्या फेरीत 455 मते मिळवत विजय‎:निकालानंतरच्या विजयी मिरवणुकीत शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टरचीच चर्चा‎

औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती वर्चस्व सिद्ध केले. जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी सकाळी साडेनऊ वाजता पहिल्याच फेरीत ४५५ मते मिळवून विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश . शहरातील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात सकाळी ८ वाजता चार टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण ६३७ पैकी ६३० मतदारांनी मतदान केले होते. यातील…

Read More

पंढरपूरमध्ये खासदार धनंजय महाडिकांवरील पोस्टवरून राडा:सुस्ते गावात दोन गटांत फ्री-स्टाईल हाणामारी! परिसरात दहशतीचे वातावरण

पंढरपूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमातील राड्याची घटना ताजी असतानाच आता सुस्ते गावात दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार धनंजय महाडिक यांच्याविषयी समाजमाध्यमांवर सुरू असलेली टीका-टिप्पणी आणि त्यातून एकमेकांना दिलेल्या आव्हानांमधून हा वाद पेटला, ज्याचे रूपांतर अखेर एका रक्तरंजित हाणामारीत झाले….

Read More

मुलांनी 4 हजार बिजांची "सीड बँक' केली तयार:निसर्गाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घालून दिला एक अनोखा आदर्श‎

चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण घेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी जवळपास ४ हजार बीजांचे संकलन केले आहे. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ही “सीड बँक’ नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. या उपक्रमात राजेश्वर कॉन्व्हेंट, जुने शहर, सन्मित्र पब्लिक स्कूल, किड्स पॅराडाईज स्कूल, मेडिकल अभिजित फार्म अँड…

Read More

दिव्य मराठी विशेष‎:एसटीची 10% हंगामी भाडेवाढ महिनाभर कायम, डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचे दिले कारण

उन्हाळी सुट्ट्या संपल्या तरी लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणारा कात्रीचा विळखा तूर्तास कायम राहणार आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बससेवांसाठी लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ आणखी एक महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुधारित वाढीव भाडेदर १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत…

Read More

लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल देऊ नका:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश; कॅबिनेटची 3 महत्त्वाच्या निर्णयांवर मोहोर

पुण्याच्या नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल न देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90 टक्के त्याच गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात. त्यानंतर पुन्हा ते तोच गुन्हा करतात. त्यामुळे या आरोपींना पॅरोल देऊ…

Read More

हिंगोलीत जागा शासनाची आणि नागरिकांची पक्की घरे:125 जणांना जमीन मिळाली कशी? याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वसाहती भागात जमिनीचे पीआर कार्ड शासनाच्या नावाचे असताना त्यावर नागरिकांनी घरे उभे केल्याची चित्र आहे यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीस बजावले आहेत. या प्रकरणात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत हिंगोली शहरात महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केले जाणार आहे त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता…

Read More

अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्हावा:महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचे आवाहन

श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि अक्षर रसिक सुलेखन वर्ग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे येथील भावे स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर रामदासी वाङ्मयाच्या संशोधिका-लेखिका मनीषा बाठे यांनी कार्यक्रमाचे…

Read More

संभाजीनगरचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवणार:मनपा आयुक्त अमोल येडगे यांची ग्वाही; येडगे अन् जी. श्रीकांत यांचा स्वागत, सत्कार समारंभ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त मनपा आयुक्त अमोल येडगे आणि नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार व स्वागत समारंभ शनिवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी जी. श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पुरुषोत्तम भापकर यांनी २०१३ मध्ये शहराच्या डीपीवर…

Read More

Maharashtra Rain Break Likely From July 8; Farmers Advisory Issued

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार . हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१५ जुलैपर्यंत) राज्याच्या काही भागांत धुवांधार पाऊस झाला असला, तरी दुसऱ्या पंधरवड्यात…

Read More