आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी
अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…