14 महिने पूर्ण होण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष बदलले:आ. अडसड ग्रामीण (मोर्शी), तर गुडदे शहराध्यक्षपदी
सुमारे १४ महिन्यांपूर्वी (मे २०२५) भारतीय जनता पक्षाने शहराध्यक्षपदी डॉ. नितीन धांडे, तर ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीपासून १४ महिने पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांची ग्रामीण (मोर्शी) जिल्हाध्यक्षपदी, तर नितीन गुडधे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात…