अजिंठा लेणी येथे ‘ऐतिहासिक संबंध, भारत आणि प्राचीन विश्व’ प्रदर्शन:म्युझियम ऑन व्हील्स उपक्रमाला पर्यटकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने सुरू केलेल्या ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी अजिंठा लेणीच्या पायथ्याशी ‘ऐतिहासिक संबंध: भारत आणि प्राचीन विश्व’ या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या फिरत्या संग्रहालयाला देशी-विदेशी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक इतिहासाची माहिती घरबसल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल पर्यटकांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि…