नागपूर पोलिसांचा सायबर गुन्हेगारांना दणका:नागरिकांचे साडेचार कोटी रुपये आणि २३२ मोबाईल केले परत!
नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले नागरिकांचे तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपये आणि चोरीला गेलेले २३२ मोबाईल आज त्यांना परत करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ही रक्कम आणि मोबाईल परत करण्यात आले. या…