नदीष्टचा अभ्यास:मनोज बोरगावकर यांची 'नदीष्ट' एम. ए. हिंदीला; नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकवणार
मराठवाड्यातल्या नांदेडचे सुप्रसिद्ध लेखक आणि कवी मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट कादंबरीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या एम. ए. हिंदीच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलाय. मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीच्या आत्तापर्यंत 21 हून अधिक आवृत्त्या निघाल्यात. विशेष म्हणजे या कादंबरीच्या हिंदी अनुवादाचा तब्बल 5 लाख रुपयांच्या राष्ट्रभाषा सन्मानाने गौरव झालाय. नदीष्ट कादंबरीचे हिंदी, गुजराती, कन्नड आदी…