Headlines

पाऊसमान अकोल्यातील मुळा खोऱ्यात आनंद! आंबित ओव्हरफ्लो:गतवर्षीपेक्षा महिनाभर उशीर, तरीही प्रथम भरण्याचा मान कायम

अकोले तालुक्याच्या मुळा खोऱ्यातील दुर्गम आदिवासी भागासाठी रविवार, २८ जूनचा दिवस मोठा आनंदाचा ठरला. मुळा नदीवरील अंबित लघुपाटबंधारे जलाशय पूर्ण १९१ दशलक्ष घनफूट क्षमतेने भरून सकाळी सांडव्यावरून ओव्हरफ्लो झाला. यंदा मान्सूनने सुरुवातीला ओढ दिली असली, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने अंबित जलाशय तुडुंब भरल्याने संपूर्ण मुळा नदीखोऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे. अकोले तालुक्यातील सर्व…

Read More

राहुरी:कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करत मेव्हण्याची दुचाकी पेटवली

राहुरी फॅक्टरी परिसरातील प्रसाद नगर येथे कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ व मारहाण करून, तिच्या भावाची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा नवनाथ मोरे (वय २१, रा. प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे पती नवनाथ भाऊसाहेब…

Read More

भेसळखोरांचे धाबे दणाणले:कारवाईच्या धास्तीने जामखेडात दुग्धजन्य पावडरच्या 50 गोण्या वनक्षेत्रात फेकल्या, दिघोळ-तेलंगशी रस्त्यावरील प्रकार

राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील दिघोळ–तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरसदृश पदार्थाच्या तब्बल ५० ते ६० गोण्या बेवारस अवस्थेत टाकून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी, पशुपालक…

Read More

मान्सून . सुटीच्या दिवशी पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका:जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दमदार, तर काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर २२ जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पावसाचे वितरण संमिश्र असले तरी, ज्या भागात पाऊस बरसला, तिथे शेतीच्या मशागतीच्या कामांनी चांगला वेग घेतला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे….

Read More

वाढत्या प्रदूषणाला वृक्षसंवर्धनानेच नगरकर देणार उत्तर:वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपण; नागरिकांनी स्वीकारली वृक्षसंवर्धनाची जबाबदारी

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना अहिल्यानगर शहराच्यावतीने व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, परिसरातील नागरिकांनी लावलेल्या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारत हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता न ठेवता वृक्षसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले. शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले,…

Read More

कर्जमाफीसाठी आज संभाजीनगरातील केंब्रिज चौकात रोहित पवारांचे आंदोलन:सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ असणार उपस्थिती

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने सोमवारी (२९ जून) सकाळी ११ वाजता केंब्रिज चौकात भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या महाआंदोलनात संपूर्ण मराठवाड्यातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, तब्बल एक हजारांहून अधिक बैलगाड्या रस्त्यावर उतरण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित…

Read More

नशेतून हत्याकांडाचा थरार:रॅप साँग गाण्यावरून संभाजीनगरात टोळक्याकडून तरुणाची हत्या, भाऊ गंभीर जखमी; भररस्त्यात चाकू, दगड, विटांनी मारहाण

मुंबईहून आलेल्या मित्राला भेटल्यानंतर टोळके दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी रॅप साँग कोण चांगला गातो यावरून त्यांच्यात वाद झाला आणि दोन गट पडले. वादानंतर तेथून सर्वजण पांगले. मात्र डोक्यात राग गेलेल्या टोळक्याने दुसऱ्या गटाला रस्त्यात गाठून चाकू, दगड, विटांनी मारहाण केली. यात शेखर ऊर्फ पिया देविदास लहाने (२२,रा. इटखेडा) याचा मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन परिसरातील राजूनगर…

Read More

दिव्य मराठीतर्फे दहावी-बारावीच्या गुणवंतांचा 'प्रतिभा सन्मान 2026':चारित्र्य आणि मूल्ये जपा, पोलिस उपायुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

“चांगले करिअर आणि निरोगी आयुष्यासाठी चारित्र्य व मूल्ये जपा, कारण एक चुकीचा मित्र किंवा एक चुकीचा निर्णय आयुष्य वेगळ्या मार्गाला लावू शकतो,’ असा सल्ला परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी शनिवारी (२७ जून) येथे विद्यार्थ्यांना दिला. ‘दै. दिव्य मराठी’तर्फे आयोजित “दिव्य मराठी प्रतिभा सन्मान २०२६’या उपक्रमांतर्गत दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला,…

Read More

22 राज्यांत पोहोचलेल्या मान्सूनचा वेग मंदावला:आसाम, मेघालय, बंगालमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; 6 राज्यांत मान्सूनपूर्व पाऊस

मान्सूनने 24 जूनपर्यंत देशातील 22 राज्यांना व्यापले आहे, परंतु कालपासून त्याचा वेग मंदावला आहे. तो मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये पुढे सरकू शकलेला नाही. हवामान विभागाच्या मते, मान्सून 5 जुलैपर्यंत उर्वरित राज्यांना व्यापू शकतो. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 6 राज्यांच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. विभागाने आज आसाम,…

Read More

दो बुंद जिंदगी के:शहरात 196 बूथवर 34,594 बालकांचे पहिल्या दिवशी केले पोलिओ लसीकरण, आणखी 5 दिवस सुरू राहणार मोहीम

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ जूनला संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी जळगावला ३४ हजाराहून अधिक बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्याच दिवशी प्रत्येक केंद्रावर नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. शहरात महापालिका रुग्णालयांसह जीएमसी व प्रत्येक कॉलनी परिसरात असे १९६ बूथ तयार केले…

Read More