Headlines

टीईटी पेपरफुटीचा निषेध:युवक काँग्रेसने जाळला शिक्षणमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महा-टीईटी) परीक्षेच्या कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ अमरावती शहर (जिल्हा) युवक काँग्रेसने आज, रविवारी सकाळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या पुतळ्याचे दहन केले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे आणि एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वराज पोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भिवंडी येथून पेपरफुटीची प्राथमिक माहिती समोर…

Read More

हक्कांसोबत कर्तव्याची शिकवण देणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड:स्मृती दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक संघटनांकडून प्रा. बी. टी. देशमुखांना आदरांजली

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे आधारवड आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांचे नुकतेच (१९ जून) दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील समस्त प्राध्यापकांच्या वतीने दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी एकत्र येत भाऊंच्या संघर्षमय…

Read More

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपत राय आता 11 जुलै रोजी होणाऱ्या ट्रस्टच्या बैठकीत सहभागी होऊ शकतात. त्याच दिवशी त्यांच्या राजीनाम्यावर विचार केला जाणार आहे. चंपत राय यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक…

Read More

शिक्षकांपूर्वीच शिक्षणाधिकारी शेख शाळेत दाखल:शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजाचा घेतला आढावा, शैक्षणिक सीमावर्ती शाळांची अचानक पाहणी

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण व्यवस्थेला प्राधान्य देत शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शनिवारी पहाटेच अक्कलकोट तालुक्यात सीमावर्ती भागातील जिल्हा परिषद शाळांची अचानक पाहणी केली. विशेष म्हणजे शिक्षकांच्या उपस्थितीपूर्वीच शाळेत दाखल होत त्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांच्या या कार्यतत्परतेचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. पाहणीची सुरुवात संगोगी (ब) येथील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात…

Read More

शहीद जवानांचे बलिदान राष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक:शहीद जवान अप्पासाहेब काटे यांच्या स्मृतिस्थळाचे लोकार्पण

कुंभेज देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय सेनेचे कर्नल सुनील राजदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी सैनिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मेजर सुभाष मुटके यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी कॅडेट्सनी राष्ट्रध्वज…

Read More

जिल्ह्यामध्ये ‘पीएम आवास’चा बोजवारा:तब्बल 93 हजार घरकुले अजूनही अपूर्ण, वाचा प्रधानमंत्री योजनेची आकडेवारी

केंद्र सरकारच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांना हक्काची पक्की घरे मिळण्यास मदत झाली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रगती कमालीची थंडावली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात दिलेले एकूण उद्दिष्ट १०२२९९…

Read More

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला:आर्द्रा नक्षत्रात बरसल्या सरी; अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात मुसळधार‎

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे कमालीचा सुखावला आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग मिळण्याची शक्यता…

Read More

नसरापूरप्रकरणी नराधमाच्या शिक्षेवर आज अंतिम निर्णय शक्य:फाशी की जन्मठेप यावर निर्णय, सरकारी वकिलांची मृत्युदंडाची मागणी

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर….

Read More

जगन्नाथांना जलाभिषेक . इस्कॉन राधा-दामोदर मंदिरात भाविकांची मांदियाळी:आजपासून पंधरा दिवस भगवंताला वनौषधी काढा, डाळखिचडीचा प्रसाद

जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर भगवान जगन्नाथ यात्रेस सोलापुरात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी देवाला जलाभिषेक केला जातो. जलाभिषेकामुळे भगवंत पंधरा दिवस आजारी पडतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवाच्या डोक्याला शाल बांधण्यात येते. दूध, हळद, दालचिनी, वनऔषधीपासून काढा दिला जातो. डाळ खिचडीचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. त्याच पध्दतीने सोलापुरातील जुना कुंभारी नाका येथील इस्कॉन मंदिरात रविवारी…

Read More

शिवरायांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल:सुधाकर इंगळे महाराजांनी‎व्यक्त केले विचार‎

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे क्रांतिकारी पाऊल होते असे विचार सुधाकर इंगळे महाराज यांनी येथे बोलताना मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर कोकण कडा मित्र मंडळ, महाड व रायगड प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात त्यांचे किर्तन झाले. ते पुढे म्हणाले, राजमुद्रा ही संस्कृतमध्ये असावी हा निश्चय म्हणजे क्रांतिकारी निर्णय होता. या रायगडावर तीन राजांचे राज्याभिषेक…

Read More