हिंगोली जिल्ह्यात बोगस किटकनाशकांचा सुळसुळाट:कृषिमंत्री भरणेंच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
हिंगोली जिल्ह्यात बोगस खते व किटकनाशकांचा सुळसुळाट झाला असून याकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 28 गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या छायाचित्राला पैशांचा हार घालून आंदोलन केले. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड व कीटकनाशक औषधांची विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात…