पारनेरमधील रस्त्याचे काम मंजूर आराखड्याप्रमाणेच करा:खासदार नीलेश लंके यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश
“पारनेर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालय ते हिंद चौक दरम्यानच्या रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत मंजूर आराखड्याप्रमाणेच झाले पाहिजे. पुढील ५० वर्षांचा विचार करून या रस्त्यावर विविध अत्याधुनिक सुविधांसाठी आत्ताच तरतुदी करण्यात याव्यात,” अशा स्पष्ट आणि कडक सूचना खासदार नीलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत देवीभोयरे फाटा (पारनेर) ते…