शेळावेत सामाजिक सलोख्याचे दर्शन:मोहरमनिमित्त ग्रामस्थांकडून गावातील मुख्य चौकात सरबत वाटप
पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गावात मोहरम निमित्त सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपत भव्य सरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यातून गावातील धार्मिक एकोप्याचे दर्शन घडले.मोहरम या पवित्र महिन्याचे औचित्य साधून गावातील मुख्य चौकात सर्वधर्मीय बांधवांसाठी थंडगार सरबत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम…