रांगोळी प्रदर्शनातून संभाजी महाराजांचे शौर्य उलगडले:पुणे येथे जयंतीनिमित्त समिती आणि ट्रस्टतर्फे विविध उपक्रम
पुणे येथे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रांगोळी प्रदर्शनातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि जीवन पुणेकरांसमोर उलगडले. या प्रदर्शनात सिंहाशी झुंज देणारे संभाजी महाराज, त्यांचा बंदिवासातील प्रसंग आणि मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे चित्रण करणाऱ्या रांगोळ्या विशेष लक्षवेधी ठरल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमांमध्ये…