Headlines

आज काय केलं, फुस्सससस, फुस्सससस!:परिवहन खातं पंक्चर झालं का? गुणरत्न सदवार्तेंचा प्रताप सरनाईकांसह राज ठाकरेंवर निशाणा

मुंबईतील रिक्षाचालकांसाठी 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय आता लांबणीवर पडला असून, रिक्षाचालकांना तयारीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक पवित्रा घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज ठाकरे यांना या मुदतवाढीवरून उपरोधिकपणे डिवचले…

Read More

महबूब खानने नाव बदलले आणि फातिमा नर्गिस बनली:नर्गिस यांच्या 97व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक किस्से

‘आवारा’, ‘श्री 420’ आणि ‘मदर इंडिया’ यांसारख्या कल्ट चित्रपटांची अभिनेत्री नरगिस दत्त फक्त एक स्टार नव्हत्या, तर हिंदी सिनेमाचा एक वारसा होत्या. आपल्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नरगिस यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रोमांचक किस्से जाणून घेऊया. नरगिस यांचा जन्म अशा कुटुंबात झाला, जिथे कला आणि संगीत वारशाचा भाग…

Read More

पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार:ओमराजे निंबाळकर म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झाला नाही, मतदार संघात जावून लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार

पवनराजे हत्याकांड्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ओमराजे म्हणाले की, सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच…

Read More

सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागातून 7 हजार कोटी रूपये वळवले:महायुतीचे नव्हे तर महाफसवणुकीचे सरकार – सुनील माने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून ८१ लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आले असून, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांचे सात हजार कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार ‘महायुतीचे नव्हे, तर महाफसवणुकीचे’ असल्याचा दावा…

Read More

आदिवासी वाड्या-वस्त्यांवर 47 पाणी टाक्यांचे वितरण:चांदवडमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम; 5 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या‎

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या ५ हजार लिटर क्षमतेच्या ४७ एचडीपीई पाण्याच्या टाक्यांचे मंगळवारी (दि. १२) आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात चांदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील विविध आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील…

Read More

हुंड्यासाठी महिला डॉक्टरचा बळी; लग्नानंतर दीड वर्षात संपवले जीवन:फ्लॅट घेण्यासाठी 12 लाखांची मागणी,पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा‎

नवी मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १२ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका २६ वर्षीय महिला डॉक्टरने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. डॉ. गौरी सुनील चौरे (दळवी) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. २ मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी…

Read More

जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले:अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन काढला काटा, तिघांना अटक

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले असून लोणार तालुक्यातील वढव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने २५ हजार रुपयांमध्ये सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना शुक्रवारी ता. १० अटक केली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील नाल्यात दोन…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कारला अपघात:दिलीप धोत्रे सुखरूप, किरकोळ जखमी पुण्यात उपचार‎

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर कारला मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, सुदैवाने दिलीप धोत्रे आणि त्यांचे चालक बालंबाल बचावले आहेत. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. दिलीप धोत्रे हे मागील दोन दिवसांपासून…

Read More

क्वांटम तंत्रज्ञान संशोधनासाठी निधी कमी पडू देणार नाही:भविष्यातील प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य द्या- चंद्रकांत पाटील

पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन आणि फॅकल्टी डेव्हलपमेंटसारख्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि आयआयएसईआर पुणे…

Read More

आंदोलन अटळ; विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी घेतली द्वारसभा:धरणे, मोर्चा निघणार, 1 जून रोजी कामबंद, 8 पासून संप‎

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी म.रा. विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने महिनाभराआधीच आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे हा संप अटळ आहे. त्याच्या तयारीसाठी आज, सोमवार ११ मे रोजी द्वारसभा घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित संप-वजा-आंदोलनामुळे विद्यापीठांच्या शैक्षणिक व परीक्षा कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे….

Read More