Headlines

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली:राडारोडा हटवून वाहतूक पूर्ववत; 'एमएसआरडीसी'ची माहिती

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळली. ही घटना पूर्णपणे नैसर्गिक असून, बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी किंवा तांत्रिक त्रुटीशी तिचा संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले. लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या विक्रमी पावसानंतर सोमवारी सकाळी मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळली. डोंगरावरून…

Read More

वृंदा घेणार हरवलेल्या मोहनचा शोध:6 जुलै पासून 'सौभाग्यवती वृंदा मोहन' घेऊन येते रहस्याचा थरार

‘सन मराठी’वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेचा प्रोमो गूढतेने भरलेला असून मालिकेतील मुख्य अभिनेत्री वृंदा आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधताना दिसून येत आहे. प्रत्येक भागात रहस्याचे नवे पदर उलगडत जाणार असून वृंदाला एका अनोळखी कुटुंबाशी तिचा सामना होणार आहे. तिच्या समोर एकामागोमाग एक रहस्यांची मालिका उलगडणार आहे. मोहन खरंच…

Read More

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही…

Read More

CBSE Chairperson & Secretary Removed; S Radha Chauhan Heads Probe

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBSE च्या नवीन ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून निर्माण झालेल्या वादामुळे बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. नवीन मार्किंग प्रणालीमध्ये आलेल्या त्रुटींच्या तक्रारींमुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यासोबतच, सरकारने OSM सेवेच्या खरेदी प्रक्रियेच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे. कॅपेसिटी बिल्डिंग कमिशनच्या अध्यक्षा…

Read More

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 217 व्यवसायांची तपासणी:3 हॉटेल्स बंद, 172 अन्नपदार्थांचे नमुने घेतले; सुरक्षित, दर्जेदार अन्न नसल्याने हॉटेलवर कारवाई‎

आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २१७ आस्थापनांची तपासणी करून १७२ नमुने घेतले असून . अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा…

Read More

शेती, आरोग्य ही देशाच्या प्रगतीची दोन मजबूत चाके- डॉ.व्हलेरियन फर्नांडिस:पैठण येथे रोटरी क्लबतर्फे प्रगतिशील शेतकरी, डाॅक्टरांचा गौरव‎

कृषी दिन आणि डॉक्टर्स डेचे औचित्य साधून रोटरी क्लब पैठणच्या वतीने बुधवारी पैठण औद्योगिक वसाहतीतील सेंट पॉल्स मिलन हॉल येथे प्रगतिशील शेतकरी आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे ट्रेनर तथा सेंट पॉल्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक रो. डॉ. व्हलेरियन फर्नांडिस यांच्या हस्ते नानेगाव येथील युवा शेतकरी बाळासाहेब माने, मुधलवाडी येथील…

Read More

ब्रह्मपुरी वेगळा जिल्हा करण्यात यावा:सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव; स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त, सरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार

विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीपासून ते मुद्रांक शुल्क घोटाळा, स्मार्ट मीटर, शासकीय जमिनींची लूट, SRA आणि AMRUT योजनेतील कथित अनियमितता अशा अनेक विषयांवर सरकारला धारेवर धरले. विधानसभेत आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र…

Read More

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात दाट ढग जमा झाल्यानंतर अचानक जोरदार वारे सुरू झाले आणि पावसाने हजेरी लावली….

Read More

तलवाडा भक्तीचे केंद्र- पंढरीनाथ महाराज पगार:तलवाडा येथे प्रभू श्रीराम, शनेश्वर महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथे प्रभू श्रीराम व शनेश्वर महाराज मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा संत-महंतांच्या पवित्र उपस्थितीत उत्साहात पार पडला. याप्रसंगी धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार व पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी संत-महंतांनी धर्म, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. मंदिराच्या उभारणीमुळे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी पंढरीनाथ महाराज म्हणाले की, तलवाडा हे गाव…

Read More

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; दोन घाटमार्ग विस्कळीत:वरंध घाट, कुसगाव खिंडीत वाहतूक ठप्प; प्रशासन सतर्क

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंध घाट आणि खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणाऱ्या कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पंढरपूर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अंतर्गत येणाऱ्या वरंध घाटात शिरगाव गावाच्या हद्दीत आज मोठी दरड कोसळली. घाटमाथ्यावर…

Read More