Headlines

संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको:खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात, ‘पुन्हा आंदोलन करू’चा इशारा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:समीर सत्तार, आमदार संजना जाधव यांच्यासह 9 जणांचे अर्ज वैध 1 बाद

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सत्तारांविना करण्याच्या धोरणाला शुक्रवारी (19 जून) धक्का बसला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या आमदार संजना जाधव, सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचे अवैध ठरलेले अर्ज आता वैध ठरले आहेत. विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांच्याकडे 9 जणांनी 10 अर्ज सादर करत अपील केले होते. यापैकी केवळ एका उमेदवाराचा (इंदुमती साहेबराव पाटील) अर्ज अवैध ठरला…

Read More

कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटरसह 50स्टार्टअप सुरू करा- राज्यपाल जिष्णू वर्मा:कृषी पदवीधरांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासह होणार उत्पादनांची विक्री‎

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२३ राज्यातील कृषी व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. यात राज्यपालांनी प्रत्येक कृषी विद्यापीठाला कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषी उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषीवर आधारीत उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून…

Read More

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य:३० जूनपर्यंत न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी ३० जून २०२४ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार…

Read More

'शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है':संग्राम जगतापांचा इशारा, म्हणाले – 26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान एका सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता परिसरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत संग्राम जगताप यांनी, “शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है” असा थेट इशारा…

Read More

मोठा करार:भारत-अमेरिका पृथ्वीतून काढणार दुर्मिळ खनिजे, ‘क्वाड’ बैठकीत आराखडा सादर

पृथ्वीच्या पोटात दडलेल्या “रेअर अर्थ मिनरल्स’वर (दुर्मिळ खनिजे) एकाधिकारशाही गाजवणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी “क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीव्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेने एका मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे अमेरिकी समकक्ष मार्को रुबियो यांनी सांगितले की, हे योग्य वेळी उचललेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे. जयशंकर यांच्या मते, या फ्रेमवर्कमध्ये दुर्मिळ खनिजांचे…

Read More

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO:रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक कोसळले झाड, थोडक्यात वाचला जीव

पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण…

Read More

नसरापूर प्रकरण:आरोपीला फाशीच्या मागणीसाठी पुण्यात 'मूक मोर्चा'; पीडितेच्या वडिलांचे उपस्थित राहण्याचे भावूक आवाहन

नसरापूर येथील धक्कादायक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरातील कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी, या मागणीसाठी उद्या रविवार, 10 मे रोजी पुण्यात ‘मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी स्वतः या न्यायाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पत्रकार बांधव आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार बांधव तसेच…

Read More

'मी शिवसेना सोडलेलीच नाही':पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढण्यावरही दिले सूचक उत्तर

उद्धव ठाकरे यांना आठवडाभरात दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर आता या घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असा दावा करत त्यांनी एकीकडे तांत्रिक मुद्दा…

Read More

पूल, रखडलेल्या पाणंद रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे:पिंपळोद गावातील सुमारे 70 टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे

पिंपळोद गावातील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणंद रस्ते, स्मशानभूमीत जाण्याचा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे आहे….

Read More