Headlines

कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटरसह 50स्टार्टअप सुरू करा- राज्यपाल जिष्णू वर्मा:कृषी पदवीधरांना उत्पन्नाचे साधन मिळण्यासह होणार उत्पादनांची विक्री‎




महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दि.२३ राज्यातील कृषी व पदूम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. यात राज्यपालांनी प्रत्येक कृषी विद्यापीठाला कृषी आधारित इन्क्युबेशन सेंटर तसेच कृषी उत्पादनांवर आधारित ५० स्टार्टअप्स सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठात तयार होणाऱ्या कृषीवर आधारीत उत्पादनांची विक्री व्हावी व त्यातून कृषी स्नातकांना उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी स्टार्टअप्सना चालना देण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे. सुरुवातीला पदूम विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय याबाबत सादरीकरण करत पदूम क्षेत्रातील संधी व आव्हानांचे विवेचन केले. कृषी आयुक्त सूरज मांढरे, मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, राज्यातील चारही कृषी विद्यापीठ व पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. यावेळी पदूम सचिव तसेच कृषी आयुक्तांनी सादरीकरण केले. त्यानंतर नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी सादरीकरण केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी यावेळी विद्यापीठाबाबत सादरीकरण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी देखील आपापल्या विद्यापीठांचे सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईत महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू, कृषी व पशुसंवर्धन आयुक्त, पोक्राचे संचालक, सहकार संचालक, विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञ आणि राज्यपालांचे सचिव उपस्थित होते. कृषी विद्यापीठांसह विविध विभागाकडून सादरीकरण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *