Headlines

Rs 1.59 Lakh Stolen; Narsi Police File Case



हिंगोली तालुक्यातील गिलोरी येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा 1.59 लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील गिलोरी येथे भाजपाचे पदाधिकारी माणिकराव लोडे यांचे घर आहे. बुधवारी ता. 22 गावात विवाह सोहळा असल्यामुळे लोडे कुटुंबिय रात्री पावने सात वाजता घराला कुलुप लाऊन विवाह सोहळ्यासाठी गेले होते. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण गावच उपस्थित असल्यामुळे लोडे यांच्या घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलुप कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

यावेळी चोरट्यांनी घरातील लाकडी आलमारीचे कुलुप तोडून त्यातील 11 हजार रुपये रोख चोरट्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर घरातील संदुकाचे कुलुप तोडून त्यातील 9 ग्रॅम वजनाची सोन्याची गहु पोत, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, 30 तोळे वजनाचे चांदीचे दंडकडे, 20 तोळे वजनाचे चांदीचे काकण्ं, चार तोळे वजनाचे चांदीचे जोडवे असा एकूण 1.59 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पळ काढला.

दरम्यान, रात्री पावने आठ वाजण्याच्या सुमारास लोडे कुटुंबातील व्यक्ती कामा निमित्त घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलुप कोयंडा तोडलेला दिला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुटूुंबाला माहिती दिली. तसेच नर्सी नामदेव पोलिस ठाण्यालाही या घटनेची माहिती दिली.

गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नर्सी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास राठोड, जमादार खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले मात्र श्‍वान पथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. तर ठसे तज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी माणिकराव लोडे यांच्या तक्रारीवरून नर्सी पोलिस ठाण्यात गुरुवारीता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *