![]()
देशभरात सध्या ‘नीट’ परीक्षेवरून मोठा गदारोळ सुरू असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. ‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले आहे. परीक्षेच्या निकालात तिला ७२० पैकी केवळ १६६ गुण मिळाले होते. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, यात तिने आपल्या अपयशाबद्दल कुटुंबाची माफी मागितली आहे. निकालापासूनच होती तणावात मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील जलालपूर गावात राहणाऱ्या अंकिता सांगळे हिने नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा दिली होती. मात्र, जेव्हा या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, तेव्हा अंकिताला ७२० पैकी फक्त १६६ गुण मिळाले. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, निकाल लागल्यापासूनच अंकिता प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याच नैराश्यातून शनिवारी संध्याकाळी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘माझ्या या मृत्यूला इतर कोणालाही जबाबदार धरू नये’ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना तिथे मराठी भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. या सुसाईड नोटमध्ये अंकिताने अत्यंत भावूक शब्दांत आपल्या मनातील व्यथा मांडली आहे. तिने चिठ्ठीत लिहिले आहे की, “तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिले, पण मी तुमची एकही इच्छा किंवा अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. माझ्या या मृत्यूला इतर कोणालाही जबाबदार धरू नये. “भावा, आई-वडिलांची काळजी घे…” स्वतःचे आयुष्य संपवण्यापूर्वी अंकिताला आपल्या आई-वडिलांची मोठी काळजी सतावत होती. त्यामुळे तिने या सुसाईड नोटमध्ये आपल्या भावाला उद्देशून एक भावनिक साद घातली आहे. “माझ्या पश्चात तू आई-वडिलांची चांगली काळजी घे,” अशी विनंती तिने आपल्या भावाला केली आहे. पोलिसांचा तपास सुरू या घटनेमुळे जलालपूर गावासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह ताब्यात घेतला असून, या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हेही वाचा.. NEETनंतर MPSC औषध निरीक्षक भरतीही वादाच्या भोवऱ्यात:पेपरफुटीचे आरोप, उमेदवारांकडून चौकशीची मागणी नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न सोशल मीडियावर फिरल्याचा दावा करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर पेपरफुटी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नसून, तक्रारीतील आरोपांची छाननी सुरू असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणणे आहे. सविस्तर वाचा
Source link
अहिल्यानगरात NEET विद्यार्थिनीची आत्महत्या:सुसाइड नोटमध्ये लिहिले- 'तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही', परीक्षेत मिळाले होते 166 गुण