![]()
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठीचा प्रत्यक्ष रणसंग्राम शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मतपेटीत बंद होईल. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात ८१ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार असून २४ हजार ७३२ पुरुष आणि ११ हजार ७८ महिला असे एकूण ३५ हजार ८१० शिक्षक मतदार म
.
ही मतमोजणी विद्यापीठ रोड स्थित लोकशाही भवनात होणार असून त्यासाठीचे पहिले प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. या निवडणुकीसाठीचे सर्वाधिक १० हजार ९७ मतदार अमरावतीत असून त्या सर्वांसाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक आणि जिल्हा मुख्यालयी ११ असे एकूण २५ मतदान केंद्र उघडण्यात आले आहेत. मावळते आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक होत आहे. याशिवाय काँग्रेसच्या अदिती पोहरे-देशमुख, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, विजुक्टाचे अविनाश बोर्डे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षक आघाडीच्या संगीता शिंदे-बोंडे आणि चंद्रशेखर भोयर या दिग्गजांसह एकूण २६ उमेदवार मैदानात आहेत.
शहराच्या कॅम्प स्थित गर्ल्स हायस्कुलमध्ये मतदान केंद्र सज्ज करताना अधिकारी-कर्मचारी. (छायाचित्र : अक्षय नागापुरे.)
अमरावती शहरात ११ केंद्र जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र असून त्यापैकी अमरावती शहरात ५ ठिकाणी ११ मतदान केंद्रांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅम्प परिसरातील भातकुली तहसील कार्यालय, कॅम्प स्थित गर्ल्स हायस्कुल, जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळा (हॉटेल महफील जवळ) तसेच गोल्डन किड्स इंग्रजी आणि गणेशदास राठी उच्च माध्यमिक शाळेत ही मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
मतमोजणीचे १ ले प्रशिक्षण पूर्ण या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मतदान पसंतीक्रमानुसार होत असल्याने मतमोजणीही त्याच क्रमाने पुढे जाणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे, ज्येष्ठ अधिकारी श्रीमती माळी आणि प्रबोधिनीचे संचालक श्यामकांत म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.
^या निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. विभागातील सर्व ८१ केंद्रांवर त्या-त्या जिल्ह्यातील पोलिंग पार्टीज् रवाना झाल्या आहेत. आज, गुरुवारी सकाळीच ही प्रक्रिया पूर्णत्वास गेली. मतदान आटोपल्यानंतर सर्व मतपेट्या ह्या स्ट्रांग रुममध्ये ठेवण्यात येणार असून प्रत्यक्ष मतमोजणीपूर्वीच्या रंगीत तालमीचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे. – नयना गुंडे, निवडणूक अधिकारी, अमरावती.