![]()
गंगापूर तालुक्यातील शिरे सायगाव येथील संजय जगताप यांची पोलिस उपनिरीक्षक पदी बढती झाल्याबद्दल सिरेसायगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. जगताप यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती झाली आहे. सोबतच साडू असलेले सुरेश बालचंद नवले यांचीही पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती झाल्याबद्दल दोघांचाही सिरेसायाव, गोपाळवाडी व रोटस्थळ येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी दोन्ही मान्यवरांची फटाक्यांच्या आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली हनुमान मंदीर परिसरातील कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव, लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल चव्हाण, दादासाहेब तायडे, राजेंद्र पोळ, रवींद्र पोळ, पांडुरंग पाटील जगताप, पंचायत समिती सदस्य दादासाहेब जगताप यांची भाषणे झाली. दोन्ही सत्कारमुर्तींनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनेश पोळ, अप्पासाहेब जगदाळे, सुभाष धोत्रे विनायक चव्हाण, देविदास धोत्रे यांसह असंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाजार समितीचे संचालक अशोक जगताप, अण्णासाहेब जगताप, योगेश नेमाने, अप्पासाहेब जगताप, अन्वर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. युवा नेते गणेश जगताप यांनी आभार मानले.
Source link
उपनिरीक्षकपदी बढती झाल्याबद्दल शिरे सायगाव येथील संजय जगताप यांचा सत्कार