Headlines

केरोसीन उचलण्यास स्वस्त धान्य दुकानदारांचा नकार:अत्यल्प कमीशन, वितरण किती कालावधीसाठी राहणार याची शाश्‍वती नसल्याचे कारण




हिंगोली जिल्ह्यात केरोसीन विक्रीचे कमीशन केवळ एक रुपया लिटर असून ग्राहकअन केरोसीनची पुरवठा यामध्ये असमतोल असल्याने वादाचे प्रकार होण्याची शक्यता तसेच वितरणाचा निश्‍चित कालावधी नसल्याने हिंगोली जिल्हयातील सुमारे ८०० स्वस्त धान्य दुकानदारांनी केरोसीनची उचल करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांच्याकडे संघटनेचे दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती, सचिन अशोक काळे, शहनवाज गौरी, आसीफ गौरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. १२ निवेदन सादर केले आहे. शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत केरोसीन वितरणाचे धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच केरोसीन विक्री करण्याच्या सूचना असून त्यासाठी ६२.९० रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. त्यात वितरकांना केवळ १ रुपये लिटर प्रमाणे कमीशन दिले जाणार आहे. केरोसीन वितरणाला मिळणार मार्जीन कमी असल्याने भाग भांडवल गुंतविणे आर्थिकदृष्टया नुकसानीचे असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. या शिवाय केरोसीन वितरणासाठी आवश्‍यक असलेली संसाधने, केरोसीन साठवणुकीसाठी सुरक्षित लोखंडी टाक्या, मोजमाप करणारी मापे, वाहतुकीचे साधन, साठवणुक करण्यासाठी सुरक्षित स्थळ नसल्यामुळे केरोसीनचा साठा करावा कुठे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिल्हयात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचे अन्न धान्य वितरण कमीशन चार ते सहा महिन्यापासून प्रलंबित असल्याने अशा वेळी कोरोसीन वितरण करणे व खार्चिक कामे करणे शक्य नाही. या शिवाय अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे केरोसीन वितरण किती दिवस सुरु राहिल याची काही शाश्‍वती नाही. या शिवाय जिल्हयाला मिळणारे कोरोसीन केवळ ६० हजार लिटर असून लाभार्थ्यांची संख्या दिड लाख पेक्षा अधिक आहे. प्रत्येक कार्डमागे तीन लिटर केरोसीन वितरीत करणे शक्य नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन उचल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *