![]()
करंजगाव (ता. वैजापूर) येथे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जागेच्या वादातून झालेल्या वादामध्ये हेमंत अंबादास जाधव यांच्यावर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी हेमंत अंबादास जाधव यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सिद्धार्थ लाडू पठारे, कचरू लाडू पठारे आणि इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, वादादरम्यान सिद्धार्थ लाडू पठारे याने कॉलर पकडून जाधव यांच्या गळ्यातील अंदाजे सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची चैन ओढून नेली. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांड्याने मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर जाधव यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुढील तपास पोलीस हवालदार गणेश मच्छिंद्र गोरक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Source link
खंडाळा:करंजगाव येथे एकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल