![]()
शहरात सार्वजनिक दुर्गामाता उत्सव समितीतर्फे आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी चला खेळू खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात निवेदिका क्रांती नाना मळेगावकर
.
या स्पर्धेत लता दत्ता गात यांनी प्रथम क्रमांक मिळवून होम मिनिस्टरचा बहुमान आणि इलेक्ट्रिक स्कूटर हे आकर्षक पहिले बक्षीस पटकावले. कार्यक्रमादरम्यान क्रांती नाना मळेगावकर यांनी विविध मजेशीर खेळ, उखाणे आणि संवादांच्या माध्यमातून उपस्थित सर्व महिलांना खिळवून ठेवले. या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. या चुरशीच्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक म्हणून वॉशिंग मशीन प्रगती अजित डावकर यांनी तर तृतीय पारितोषिक म्हणून फ्रिज अश्विनी राजेश्वर जाधव यांनी जिंकले. या मुख्य पारितोषिकांशिवाय इतर विजेत्या महिलांना मिक्सर तसेच विशेष सन्मान म्हणून आकर्षक पैठणी साड्या देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उत्सव समितीच्या वतीने नगराध्यक्ष संजय जाधव व सुवर्णता जाधव यांच्या शुभहस्ते क्रांती नाना मळेगावकर तसेच उपस्थित सर्व महिलांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उपनगराध्यक्ष अमोल जगताप, संतोष अंबिलवादे, तुकाराम सटाले, सोपान देशमुख, योगेश पाटील, सुनिताताई खंडागळे, सुनीता सोळके, रेखा राजपूत, शीला जाधव, संगीता वाघ, शीतल नावंदर यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जयेश निरफळ यांनी केले.